मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूखंड घोटाळ्याची कागदपत्रे कुणाला दिली? - संजय राऊत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूखंड घोटाळ्यावरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशनात वातावरण चांगलेच तापवले होते. याच पार्श्वमहाराष्ट्रात विरोधकांनी शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतानाच आता ठाकरे गटाने दिल्लीतही शिंदे यांच्याविरोधात हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकरणी शिंदे यांच्यावरच थेट आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 110 कोटींचे भूखंड आपल्या मर्जीतील बिल्डरांना 2 कोटीत दिले. जे 16 भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव होते. त्यावर काही निष्कर्ष काढण्यात आले होते. तेव्हा भूखंड वाटपाला विरोध झाला होता. तरीही तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ भूखंड वाटप केलं होतं.
तसेच मुख्यमंत्र्यांवरील आरोप गंभीर आहेत. त्यामुळे आम्ही केंद्रातील प्रमुख लोकांना कागदपत्रं पाठवली आहेत. योग्य ठिकाणी कागदपत्रं गेली आहेत. अनेक तपास यंत्रणांकडे कागदपत्रं गेली आहेत. आम्ही योग्य ठिकाणी कागदपत्रे दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाईने दिल्लीत आले. राज्यात एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला. अण्णा हजारे हे या विषयावर गप्प का आहेत? सरकारने बोहणीचा भ्रष्टाचार केला. त्यावर कोणी काहीच बोलत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारवासारव करतात. ही मोदींच्या विचारधारेची फसवणूक आहे. असे संजय राऊत म्हणाले.