बातम्या
राज्याला मुख्यमंत्री नाही, मख्खमंत्री आहे - संजय राऊत
शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटामध्येएकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटामध्येएकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, मविआच्या एकत्र सभा आणि उद्धव ठाकरेंच्याही स्वतंत्र सभा होतील. लाल वादळ येऊन ठेपलंय. किती काळ त्यांना रोखणार तुम्ही. मुख्यमंत्री फक्त ४० खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम करत आहेत. सगळी सूत्र उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत. या राज्याला मुख्यमंत्री नाहीत. या राज्याला मख्ख मंत्री आहेत. असे राऊत यांनी मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल केला आहे.