बाळासाहेब ठाकरेंचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कुणी दाखवली नव्हती; मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया अपेक्षित - संजय राऊत

बाळासाहेब ठाकरेंचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कुणी दाखवली नव्हती; मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया अपेक्षित - संजय राऊत

भाजपा नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडल्यासंदर्भात एक वक्तव्य केलं.

भाजपा नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडल्यासंदर्भात एक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते. “बाळासाहेब ठाकरेंची, शिवसैनिकांची बाबरी पाडण्यात कोणतीही भूमिका नाही. बाळासाहेब ठाकरेंनी बाबरीला शिलेदार पाठवले नव्हते. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावर प्रतिउत्तर देत संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कुणी दाखवली नव्हती.भाजपाचे लोक सातत्याने शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करत आहेत. बाबरी तोडणारे आमचे, भाजपाचे किंवा अन्य कुणीही नव्हते. ते शिवसैनिक होते. बाबरी तोडली आणि त्यानंतर भाजपानं पलायन केलं हा इतिहास आहे. ज्या पळपुट्यांना घेऊन आज भाजपाने सरकार बनवलं आहे, त्यांची हिंमत एवढी वाढली आहे की ते आता बाळासाहेब ठाकरेंवरही चिखलफेक करू लागले आहेत. यावर आज मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. पण हिंमत असेल तर. कारण ते गुलाम आहेत. असे संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कुणी दाखवली नव्हती; मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया अपेक्षित - संजय राऊत
“चंद्रकांत पाटलांच्या मुखातून भाजपा बोललाय, तुमच्यात हिंमत असेल तर...; शिंदे गटाला राऊतांचे आव्हान
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com