मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोंडाला चिकटपट्टी लावून का बसले आहेत? – संजय राऊत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोंडाला चिकटपट्टी लावून का बसले आहेत? – संजय राऊत

संजय राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वर्षानुवर्ष शिवसेनेचा महापौर महापालिकेत असताना भाजपने महापौर पदावर आमचाच माणूस बसणार असल्याचं जाहीर केले. यावरुन राऊत यांनी टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असं भाजप म्हणत असेल तर शिवसेना म्हणवणारे लोक आहेत ते तोंडाला चिकटपट्टी लावून का बसले आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा फुटलेला गट गप्प का आहे? त्यांनी या मुद्द्यावर उत्तर द्यावं.भाजपचा झेंडा मराठी माणसाचा नाही. तो व्यापाऱ्यांचा आणि शेटजींचा झेंडा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मुद्द्यावर तोंडाला चिकटपट्टी लावून का बसले आहेत? असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com