Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshah

राष्ट्रपतींना संसद भवनाच्या उद्घाटनासाठी का डावललं? - संजय राऊत

संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन आता भाजपावर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, नव्या संसद भवनाची गरज होती का? देशाच्या राष्ट्रपतींना उद्घाटनासाठी का डावलण्यात आलं? एका आदिवासी महिलेल्या डावलल्याबद्दल संसद भवनाचा जो 28 तारीखला कार्यक्रम आहे. त्याच्यावर काँग्रेससह सगळ्या विरोधी पक्षांनी निर्णय घेतला आहे की, आम्ही त्या सोहळ्यावरती बहिष्कार टाकू. तसेच राष्ट्रपतींना का डावललं याचे उत्तर द्यावे. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com