केंद्रात आणि राज्यात मोठ्या उलथापालथी होणार आहे; संजय राऊत यांनी थेट तारीखच सांगितली...
Admin

केंद्रात आणि राज्यात मोठ्या उलथापालथी होणार आहे; संजय राऊत यांनी थेट तारीखच सांगितली...

कर्नाटकातील निवडणूक या विषयावरुन सध्या राजकीय वर्तुळात सर्वचजण तयारीला लागले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कर्नाटकातील निवडणूक या विषयावरुन सध्या राजकीय वर्तुळात सर्वचजण तयारीला लागले आहे. त्या निवडणूकांवरुन सर्वच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. कर्नाटकात भाजपची सत्ता जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, सर्वच राजकीय पक्ष हे कर्नाटकात आहेतकर्नाटक निवडणुकीनंतर देश आणि राज्यात मोठ्या घडामोडी होणार आहेत.कर्नाटकाच्या निवडणुका होऊन जाऊ द्या. 13 मे नंतर या घडामोडी घडणार आहेत. कर्नाटकाच्या निवडणुकीनंतर म्हणजे 13 मे नंतर देशात आणि राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. असे राऊत म्हणाले. या घडामोडी नेमक्या कोणत्या हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com