आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच : संजय राऊत

आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच : संजय राऊत

संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्ही एकत्रित लढणार आहे. आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच आहे. त्यांचा पराभव व्हायला पाहिजे. हे आम्ही विधानपरिषदेच्या निवडणुकीत आम्ही दाखवून दिले असे राऊत म्हणाले.

कसबा आणि चिंचवड दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्र लढेल. चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी अशी आमची भूमिका आहे. तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेऊ. विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाचपैकी चार जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. एक जागा भाजपने जिंकली आहे. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com