Sanjay Raut : कार्यकर्त्यांची जी भूमिका असते त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागते

Sanjay Raut : कार्यकर्त्यांची जी भूमिका असते त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागते

महाविकास आघाडीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाविकास आघाडीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्या गुढीपाडवा आहे. अत्यंत शुभमुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासह आमचं सगळे घटक पक्ष यांची संयुक्त पत्रकार परिषद आहे.

यासोबतच संजय राऊत पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीतील पुढील दिशा, झालेलं जागावाटप, प्रचारयंत्रणा कशी राबवली जाईल. अनेक गोष्टी आहेत. त्यासंदर्भात आमचे प्रमुख नेते उद्या माहिती देतील. महाविकास आघाडीमधलं सगळं किरकोळ वाद मिटलं आहेत. कोणी टोकाची भूमिका घेतलेली नाही.

आघाडी किंवा युतीमध्ये जागावाटपात एखाद दुसऱ्या जागेवरुन असं कार्यकर्त्यांची जी भूमिका असते त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागते. समजूत काढली जाते. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन मार्ग काढलेला आहे. याचा अर्थ असा नाही की कुणी टोकाची भूमिका घेत आहे. वेगवेगळे पक्ष येऊन आघाडी बनते. कार्यकर्त्यांचे मन राखणं ही प्रत्येक नेत्यावरती फार मोठी जबाबदारी असते. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com