होय आम्ही स्वयंभू, कुणाला पोटदुखी झाल्यास आमच्याकडू उपचार - संजय राऊत

होय आम्ही स्वयंभू, कुणाला पोटदुखी झाल्यास आमच्याकडू उपचार - संजय राऊत

ही मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतली.

‘लोकमत’च्या पुरस्कार सोहळ्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत पार पडली. विशेष म्हणजे ही मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतली. यावेळी यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील नेत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?, असा प्रश्न विचारला.

यावर उत्तर देत राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला जपून राहा, देवेंद्र फडणवीस यांना काय सल्ला वरती संबंध जपून ठेवा असा दिला. तर अजित पवार यांना "मला जरा याबाबत सविस्तर बोलायचंय. अजित पवार हे जसे बाहेर लक्ष देतात तेवढं तुम्ही काकांकडे लक्ष द्या असे राज ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना काय सल्ला द्यायचा ते संयभू आहेत. असे राज ठाकरे म्हणाले.

यावर प्रतिउत्तर देत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, होय आम्ही स्वयंभू, कुणाला पोटदुखी झाल्यास आमच्याकडे उपचार आहेत. जे स्वयंभू असतात त्यांच्यामागे जनता जाते. शेंदूर फासलेल्या दगडाचं दर्शन कुणी घेत नाही. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com