निलेश लंके आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार; संजय राऊत म्हणाले...

निलेश लंके आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार; संजय राऊत म्हणाले...

लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. आमदार निलेश लंके आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. आमदार निलेश लंके अजित पवारांची साथ सोडणार आहेत.

शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. निलेश लंके हे पारनेरचे आमदार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला हा मोठा धक्का बसला आहे.दक्षिण अहमदनगरमधून निलेश लंके लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, कालच मला हे समजलं. काल मी आणि पवार साहेब व्यासपीठावर होतो. निलेश लंके यांच्यासोबत माझी एकदा चर्चा झाली या विषयावर. घरवापसीपेक्षाही शरद पवार हेच सगळ्यांचे लक्ष आहे आणि ते पुन्हा तिथे येऊन लोकसभा लढणार असतील तर नक्कीच महाराष्ट्रात त्यांच्या या भूमिकेचं स्वागत होईल. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com