Sanjay Raut : मोदींना देशामध्ये पुतिन मॉडेल आणायचंय

Sanjay Raut : मोदींना देशामध्ये पुतिन मॉडेल आणायचंय

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, प्रधानमंत्री मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा ज्या पद्धतीने खाली आणणेली आहे ती अत्यंत संविधान आणि लोकशाहीसाठी धोक्याची आहे. प्रधानमंत्र्यांनी इतके खोटं बोलू नये या मताचे आम्ही आहोत. राजकारणात लोक खोट बोलतात. पण प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीने मर्यादा पाळल्या पाहिजे. पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा पाळली पाहिजे.

तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की, राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये विरोधकांनासुद्धा महत्व आहे हे मोदी मानायला तयार नाहीत. हाच संविधानाला खतरा आहे. मोदींना लोकसभा, विधानसभा या विरोधकांशिवाय हव्या आहेत. मोदींना देशामध्ये पुतिन मॉडेल आणायचं आहे. विरोधक नको.

संविधानाला सर्वात मोठा खतरा असेल तर मोदींची ही विचारसरणी, मोदींची भूमिका. खोटं बोलायचे, विरोधकांना बदनाम करायचे , विरोधकांवर खोटे आरोप करायचे, विरोधकांना तुरुंगात टाकायचे, विरोधकांना धमक्या द्यायच्या आणि सगळे भ्रष्टाचारी लोक, खंडणीखोर आपल्या पक्षात घ्यायचे. हाच सर्वात मोठा आपल्या देशाच्या संविधानाला खतरा आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com