मुंबई महापालिका निवडणुका होईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुक्काम मुंबईत राहू शकतो - संजय राऊत
Admin

मुंबई महापालिका निवडणुका होईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुक्काम मुंबईत राहू शकतो - संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, १० फेब्रुवारी रोजी पूर्वनियोजित कामांसाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या या मुंबई दौऱ्याला विशेष महत्व आहे. या दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमीत्त रस्त्यांवर बॅनर लावण्यात आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, दिल्लीत संसद सुरू असताना. महत्त्वाचे विषय असताना, अदानीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरलेलं असताना मोदी मुंबईत येत आहेत. वंदे भारत ट्रेन हे निमित्त आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई महापालिका जिंकायची आहे. हे फार महत्त्वाचं आहे. असे राऊत म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, मुंबई महापालिकेची तारीख निश्चित होत नाही, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुक्काम दिल्लीतून मुंबईतही राहू शकतो. ते मुंबईत घर घेऊ शकतात किंवा राजभवनात मुक्काम करू शकतात. कारण महापालिका जिंकण्यासाठी या मुंबई महाराष्ट्रातील भाजप आणि मिंधे गटाचे लोक समर्थ नाहीत. मोदी आले आणि अख्खा देश लावला तरी महापालिका शिवसेना जिंकेल. असे राऊतांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com