संजय मंडलिक यांच्या वादग्रस्त विधानावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

संजय मंडलिक यांच्या वादग्रस्त विधानावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

खासदार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

खासदार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. खासदार संजय मंडलिक म्हणाले की, आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. ते खरे वारसदार नाहीत. तुम्ही आम्ही आणि कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, मग मंडलित वारसदार आहेत का? या मंडलिक यांचे वडील शाहू महाराज यांच्या खूप जवळ होते. या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकते आहे हे म्हटल्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानावर ज्याप्रकारे चिखलफेक करता हे लक्षण चांगले नाही.

तसेच ते पुढे म्हणाले की, शाहू महाराज यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जी भूमिका घेतलेली आहे. ते आधीपासून सामाजिक कार्यामध्ये आहेत. कोल्हापूरच्या घडामोडीमध्ये काय करतात. अशावेळेला राजकीय स्वार्थासाठी हे उमेदवार आहेत मंडलिक त्यांनी ही भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार नाही. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com