Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून अजित पवार यांचे कौतुक तर संजय शिरसाट यांच्यावर निशाणा

Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून अजित पवार यांचे कौतुक तर संजय शिरसाट यांच्यावर निशाणा

मात्र आता संजय राऊत यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. संजय राऊत नक्की काय म्हणाले? याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
Published by :
Shamal Sawant
Published on

संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरुन पुन्हा एकदा भाष्य केले आहे. विधानसभा निवडणुकांदरम्यान महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेमुळे सरकारला निवडणुकांमध्ये खूप फायदा झाला. मात्र आता संजय राऊत यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. संजय राऊत नक्की काय म्हणाले? याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

समाजकल्याण खात्याचा भार संजय शिरसाट सांभाळत आहेत. त्यांनी या खात्याचा पैसा लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याचे म्हंटले होते. यावर संजय राऊत म्हणाले की, विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी बहीणींना 2100 रुपये देणार असल्याचे म्हंटले होते. अजित पवारांनीदेखील असं काही बोललो नव्हतो, कर्जमाफीबद्दल काही बोललो नव्हतो म्हणाले होते. पण सरकार तुमचं आहे ना? तुम्ही त्या सरकारमध्ये आहात णा? जो तो म्हणत आहे कि माझ्या खात्याचा पैसा पळवला. पण हा पैसा लाडक्या बहीणींनाच दिला ना. लाडक्या बहीणींना पैसा दिला म्हणून तुम्ही का रडताय? त्याआगोदर मतं हवीत म्हणून कसे हसत होतात".

पुढे संजय राऊत म्हणाले कि, "तुमच्या खिशातील पैसा वळवला आहे का? सरकारचा पैसा आहे ना? याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहीणींना फसवत आहात. तुमचे जे सामाजिक न्याय विभगाचे कार्य आहे त्याचीदेखील फसवणूक करत आहात".

अजित पवार खमके अर्थमंत्री :

आता खात्यामध्ये पाकीटमारी करणे सोपे नाही. महाराष्ट्राला अजित पवार यांच्यासारखे खमके अर्थमंत्री मिळाले आहेत. आमच्या काळात आम्ही पाहिले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com