नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांची माघार; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांची माघार; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीतून माघार घेत असल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
Published by :
Siddhi Naringrekar

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीतून माघार घेत असल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये आता कोणीही उमेदवार राहिला नाही. शिवसेनेचं उमेदवार राजाभाऊ वाजे हे एवढे पुढे गेलेलं आहेत. भुजबळ कोणत्याही परिस्थितीमध्ये नाशकामध्ये जिंकत नाहीत ही त्यांना खात्री पटलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता कोणालातरी जागा दिली असेल. तर त्यांना आपलं डिपॉझिट वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे नाशिकमध्ये बाकी काय आहे. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com