Sanjay Raut : उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर राऊतांची प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी भाजपाच्या नव्या नेत्यांवर टीका केली, जुन्या युतीच्या महत्त्वावर भर दिला.
Published by :
Team Lokshahi

उद्धव ठाकरे आणि चंद्रकात पाटील यांच्या भेटी दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत माध्यामांशी संवाद साधताना म्हणाले की, "चंद्रकात पाटील आमचे मित्र आहेत.... चंद्रकात पाटील हे शिवसेना भाजपाच्या युतीमध्ये असल्यापासून समर्थक राहिले आहेत, ते मला माहिती आहे... विशेषतः शिवसेना भाजपाच्या युतीच्या संदर्भात जी जुनी पिढी होती.... आमच्यासारखं ज्यांनी एकत्र काम केलं, त्यामध्ये चंद्रकात दादांसारखे नेते होते.. कदाचित आता जे भाजपमध्ये बाहेरून हौसे, नवशे, गवसे आलेले आहेत, त्यांना २५ वर्षातल्या आमच्या युतीचे महत्त्व कळणार नाही... त्यांचा ना भाजपाशी संबंध, ना हिंदुत्वाशी संबध... असं म्हणत संजय राऊत यांनी महायुतीवर टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com