Sanjay Raut : 'बटेंगे तो कटेंगे, हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीलाही दिलाय'

Sanjay Raut : 'बटेंगे तो कटेंगे, हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीलाही दिलाय'

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, बटेंगे तो कटेंगे हा फक्त मोदींचाच नारा नाही आहे. बटेंगे तो कटेंगे या संदेश मोदींनी इंडिया आघाडीला ही दिला आहे. आम्ही लोकसभेला एकत्र लढलो.

आघाडीतला प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता. पण त्यानंतरच्या राज्यातल्या निवडणुकांमध्ये हे इंडिया आघाडीचे गणित जमू शकले नाही. उद्या भविष्यात इतर काही निवडणुका आहेत. म्हणजे राज्य हे आम्ही भाजपत्या हातात द्यायची. राज्य जर भाजपच्या हातात दिली तर लोकसभा कशी लढणार.

लोकसभेमध्ये आम्हाला चांगला निकाल मिळाला आहे. महाराष्ट्रात निवडणूक यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झालेले आहेत, दिल्लीमध्ये देखील ते झालेले आहेत. या सगळ्यांशी एकत्रित मुकाबला करणं गरजेचं आहे. ही जी इंडिया आघाडी आहे, महाविकास आघाडी आहे ती फक्त निवडणूक लढण्यापुरतीच आहे का? हा लोकांच्या मनात प्रश्न आहे. निवडणुकीमध्ये हार - जीत होते. इंडिया आघाडीने अनेक प्रश्नावर एकत्र येणं गरजेचं आहे. अनेक मोठे नेते इंडिया आघाडीमध्ये आहेत. इंडिया आघाडी ही मजबूतीने टीकायला पाहिजे. भाजप समोर जे आव्हान उभं करायचं आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीतला बीग ब्रदर आहे, मोठा भाऊ आहे. 100 जागा त्यांच्याकडे आहेत 100पेक्षा जास्त जागा जिंकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे पण जेव्हा आम्ही एकत्र असू तेव्हा. काँग्रेसच्या नेतृत्वाने पुढाकार घेणं आम्हाला अपेक्षित आहे. फक्त जागा वाटपामध्ये खेचाखेची करण्यासाठी आघाड्या नकोत. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com