Sanjay Raut : जेथे जेथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल तेथे अशाप्रकारे कासवगतीने यंत्रणा  चालवली

Sanjay Raut : जेथे जेथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल तेथे अशाप्रकारे कासवगतीने यंत्रणा चालवली

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अत्यंत कासव गतीने मतदान प्रक्रिया राबवा. विशेषता जिथे महाविकास आघाडीची सरशी होऊ शकते असे बूथ, असे विधानसभा क्षेत्र, असे लोकसभा मतदारसंघ अशा ठिकाणी जास्तीत जास्त गोंधळ निर्माण होईल यंत्रणेत आणि मतदार कंटाळतील रांगेतून निघून जातील अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी राबवली का काल? अशी शंका वाटावी असे चित्र आम्ही पाहिलं काल. मला इथं प्रांतिय किंवा जातीयवाद करायचा नाही. पण जेथे जेथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल अशाप्रकारे कासवगतीने यंत्रणा चालवली. भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या इतर लोकांना जेथे मतदानाचा टक्का वाढू शकेल तिथे अत्यंत व्यवस्थित कोणत्याही तक्रारीशिवाय मतदान घडवण्यात आलं.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, EVM हॅक करता आलं नाही. आम्ही जागरुक होतो. पैसे वाटप आम्ही पकडलं. तरी पैसे वाटलं. मग काय करायचं, मग अशा पद्धतीने यंत्रणा ढीली करायची. मतदारांचा छळ करायचा, 4 - 4 तास रांगेत मतदार. डिजीटल इंडिया आहे ना, याचा अर्थ मोदींचे डिजीटल इंडियासुद्धा फेल गेलं. फेल करण्यात आलं या पद्धतीने. निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशा पद्धतीने प्रयत्न केला असला तरी मतदारांवर कोणताही परिणाम झाला नाही. आम्ही शेवटपर्यंत मतदारांना आवाहान केलं की, आपण रांग सोडू नका. अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही हे दुदैवाने या लोकशाहीमध्ये घडलंय.

महाराष्ट्राच्या 13 मतदारसंघात अशा पद्धतीने यंत्रणा बिघडवण्यात आली. कारण 13ही ठिकाणी भाजपचं आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव होणार ही खात्री असल्यामुळे हा एक शेवटचा खेळ आणि डाव टाकण्यात आला. मला खात्री आहे इंडियाच जिंकणार. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com