Sanjay Raut : "...तर पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून गेला नसता"; संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेलांवर साधला निशाणा
संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत "माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. अंगूर खट्टे हैं....' असे म्हटले.
याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, "मला पवार साहेबांनीच माहिती दिली. पवार साहेबांकडून माहिती घ्यायची वेळ असती तर पवार साहेबांच्या पाठित खंजीर खुपसून आपण गेला नसता. हे गृहस्थ व्यापारी आहेत. ते म्हणत होते रंग बदलला, अहो रंग कोणी बदलला."
"आमची आमच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये ठाम उभे आहोत. पवार साहेबांना सोडून पळून कोण गेले? तुम्ही सुखात आहात ना तिकडे, भांडी घासत आहात ना त्यांची, मग करत राहा. आमच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न करु नका." असे संजय राऊत म्हणाले.