राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. असे राज ठाकरे म्हणाले. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे. महाराष्ट्राची गेल्या काही दिवसांपासून जी लूट सुरु आहे. महाराष्ट्रात अत्यंत घाणेरडे राजकारण सुरु आहे. खोक्याचे. त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. महाराष्ट्रातून उद्योग पळवला जातो. मुंबई तोडण्याचा प्रयत्न होत आहे सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात काही शंका उत्पन्न होतात. त्याची उत्तर त्यांनीच द्यायची आहेत. असं काय घडलं की तुम्हाला अचानक या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावासा वाटला. याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील.

यासोबतच संजय राऊत पुढे म्हणाले की, तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला? नमो निर्माण पक्ष होण्याची अचानक गरज काय पडली? हे त्यांनी सांगावं. त्यांच्या पक्षानं कोणती भूमिका घ्यावी. हा त्यांचा निर्णय आहे सर्वस्वी. आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी लढतो आहोत. आम्ही शरणागती पत्करणार नाही. आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजपाबरोबर राहिलो नाही. भारतीय जनता पक्षाने आपले खरे दात दाखवायला सुरुवात केली. तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो.

आम्ही स्वतंत्रपणे आमच्या भूमिका घेतल्या. जे भाजपबरोबर गेले ते फक्त शरणागती यासाठी त्यांनी पत्करली, गुडघे यासाठी टेकलं की त्यांच्या अनेक फायली उघडल्या गेल्या. त्यांना धमक्या दिल्या गेल्या. ठाकरे हे असे नाव आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना कोण झुकवू शकत नाही. हा इतिहास आहे. उद्धव ठाकरेंना झुकवण्याचा प्रयत्न झाला उद्धव ठाकरे झुकलं नाहीत. महाराष्ट्राच्या हितासाठी कोणताही निर्णय हा मला दिसत नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी जर का निर्णय असता तर कोणताही पक्ष आणि नेता या क्षणी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरुद्घ ठामपणे उभा राहिल. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com