Sanjay Raut : जर कुणी बंडखोरी करुन महाविकास आघाडीच्या विरुद्ध काम करत असेल तर त्यांच्यावर त्या पक्षाने कारवाई केली पाहिजे

Sanjay Raut : जर कुणी बंडखोरी करुन महाविकास आघाडीच्या विरुद्ध काम करत असेल तर त्यांच्यावर त्या पक्षाने कारवाई केली पाहिजे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीत विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस ही अपक्ष आहे का मला माहित नाही. जर कुणी बंडखोरी करुन महाविकास आघाडीच्या विरुद्ध काम करत असेल एक पक्षाचे लोक तर त्यांच्यावर त्या पक्षाने कारवाई केली पाहिजे. अमरावतीमध्ये दिनेश बूब यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यााधी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. जर एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असेल महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेत असेल आणि त्याच्याबरोबर महाविकास आघाडीच्या पक्षातील लोक उभे राहत असतील तर मला असं वाटतं याला पक्षाच्या शिस्तभंगाची जी भूमिका असतं. ती असायला पाहिजे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, कोणाची ताकद किती आहे आणि किती नाही हे लोक ठरवतील. त्याच सांगलीमध्ये गेल्या 10 वर्षापासून भाजपचे खासदार आणि आमदार निवडून येत आहेत. हे काय मी सांगायला नको. काँग्रेसचा बालेकिल्ला, काँग्रेसची परंपरा असतानासुद्धा मोक्याच्या ठिकाणी भाजपाचे लोक निवडून येतात. याला मी त्या पक्षाची ताकद मानत नाही. भारतीय जनता पक्षाला टक्कर द्यायची असेल तर सांगलीमध्ये शिवसेनाच उभी राहायला हवी. हे आमचं धोरण आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com