Sanjay Raut Tweet : "मला 27 भाजपा आमदारांचे फोन...", संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय घडलं?

27 भाजपा आमदारांचे फोन: शिवसेना खासदार संजय राऊतांचा दावा
Published by :
Shamal Sawant

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात घडमोडी घडताना दिसतात. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचाली घडून येतात. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेना गटातील एका नेत्याने 27 आमदारांशी फोनवर बोलणे झालं असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

संजय राऊत यांचे काही दिवसांपूर्वी 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाची सर्वत्र चर्चादेखील झाली. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पुस्तक वाचतानाचा फोटो ट्वीटरवर शेअर केला. ही पोस्ट संजय राऊत यांनी रिट्विट केली. त्यांनी लिहिले की, "हे पुस्तक सगळ्यांसाठी आहे! आतापर्यंत मला 27 भाजपा आमदारांचे फोन आले; 'नरकातला स्वर्ग' एका बैठकीत वाचून काढले, हे सांगण्यासाठी!" असं संजय राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’या पुस्तकामध्ये ईडीच्या कारवाई, तुरुंगातील अनुभव, तसेच महाराष्ट्रातील सत्तानाट्य या सगळ्यांचा उल्लेख आहे. त्यामुळेच या पुस्तकाबाबत केवळ वाचकांमध्येच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही प्रचंड कुतूहल आहे. सध्या या पुस्तकाच्या माध्यमातून संजय राऊत पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com