Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshahi

ठाकरे गट जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार; संजय राऊत

खासदार संजय राऊत हे जम्मूत आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी संजय राऊत हे जम्मूला आले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भारत जोडो यात्रेची चांगली वातावरण निर्मिती आहे. पक्ष म्हणून नाही पण देशात चांगला संदेश जात आहे. पठाणकोटला हजारो तरुण मशाली घेऊन निघाले होते. मशाली काय काँग्रेसचं चिन्हं नाही. ते शिवसेनेचं चिन्हं आहे. मलाही भरून आलं. देश जागवण्यासाठी सर्वांना हातात मशालच घ्यावी लागते. असे ते म्हणाले.

तसेच पाकिस्तानात जाऊ ना. मोदी यांनी त्याच विषयावर मत मागितली आहेत. मोदींना पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात आणणं जमलं नाही अन् आमच्या हातात सत्ता आली की पाकिस्तानात जाऊ शकतो. अखंड हिंदुस्थानाचं स्वप्नही पूर्ण करू असे राऊत म्हणाले.

शिवसेना जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा देखील संजय राऊत यांनी केली आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. देशातील महत्त्वाचा पक्ष आहे. राहुल गांधी यांचं नेतृत्व तळपताना दिसत आहे. लोकं त्यांना स्वीकारत आहेत. असे त्यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com