Sanjay Raut : महापालिकेच्या निवडणूकीबाबत राऊतांनी केलं मोठं भाकित म्हणाले...
Sanjay Raut On Eknath Shinde : शिवसेना आणि मनसे युतीने महापालिका निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. या प्रचारात ठाकरे बंधूंच्या शक्तिशाली सभा दिसून येणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन सहा सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील शिवतीर्थावरही एक खास सभा होणार आहे. पण त्यासाठी काही पक्ष आणि नेत्यांचे कटकारस्थान सुरू असल्याचं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं. ते रविवारी माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, "सत्तेच्या मोहात रडारूप गिरी करणारे हे लोक, ठाकरे बंधूंच्या सभा थांबवण्यासाठी कितीही प्रयत्न करत आहेत." राऊत यांनी एकनाथ शिंदेवरही घणाघात केला.
पुढे ते म्हणाले, "शिंदेंना सोबत घेतल्याचा भाजपला पश्चाताप येणा-या काळात 'पश्चातापाचा उद्रेक झाल्यावर राजकारणात उलथापालथ होईल" खासदार संजय राऊतांच भाकित केले आहे.
थोडक्यात
शिंदेंना सोबत घेतल्याचा भाजपला पश्चाताप- राऊत
'महापालिका निवडणुकीनंतर पश्चाताप उघडपणे दिसेल'
'पश्चातापाचा उद्रेक झाल्यावर राजकारणात उलथापालथ होईल'
खासदार संजय राऊतांचं भाकित

