Sanjay Raut
Sanjay Raut

"निवडणूक आयोग भाजपची शाखा आहे, उद्या ४ वाजता..."; लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी संजय राऊतांचा हल्लाबोल

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.

Sanjay Raut Press Conference : नरेंद्र मोदी वाराणसीहून थेट केदारनाथला जातात आणि तिथे सकाळी ध्यान करतात आणि सर्व अँगलने दहा-पंधरा कॅमेरे लावतात. चोवीस तास त्यांचा असा प्रचार सुरु आहे. निवडणूक आयोगाला हे दिसत नाही. निवडणूक आयोगही डोळे बंद करून मोदींच्या सोबत ध्यान करायला बसला आहे का? निवडणूक आयोग भाजपची शाखा आहे. उद्या ४ वाजता या सर्व शाखा बरखास्त होतील, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, ३० तारखेला १० कॅमेरे लावून ध्यानस्थ बसले होते. सर्व वृत्तवाहिन्या नरेंद्र मोदींचा मुकप्रचार दाखवत होते. ती सुद्धा एक मुक पत्रकार परिषदच होती. त्याच्यावर निवडणूक आयोगाने डोळे उघडले नाहीत. निवडणूक आयोगही ध्यानस्थ बसलं होतं का? तपस्येला बसलं होतं का? काय कारवाई होते, ते बघू. २४ तासाचा अवधी आहे. कोण कुणावर कारवाई करतं, हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल. २० तारखेला उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. पण तो प्रचाराचा मुद्दा नव्हता. निवडणूक प्रचार कसा झाला, याबाबत त्यांनी माहिती दिली.

पण भाजपच्या मुंबईच्या एका पदाधिकाऱ्याने पत्र लिहिलं, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाईचे आदेश दिले. माझ्या माहितीनुसार, माझ्या पक्षाने शिवसेनेने निवडणूक आयोगाला आतापर्यंत १७ पत्र लिहिले आहेत. ज्यामध्ये काही तक्रारी आहेत. तर काही सूचना आहेत. आतापर्यंत त्याच्यावर काही उत्तर आलं नाही. भाजपला मतदान करा, अमित शहा रामलल्लाचं दर्शन फ्रीमध्ये देणार, याप्रकारे खुला प्रचार करण्यात आला. यासाठी आम्ही पत्र लिहिलं. त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com