अरविंद केजरीवाल हरल्याचा भाजपाला आनंद - संजय राऊत

अण्णा हजारे यांच्यावरही साधला निशाणा
Published by :
Team Lokshahi

खासदार संजय राऊत यांनी दिल्ली निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल व्यक्त होताना दिसत आहेत. 5 फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर अनेक संस्थांकडून एक्झिट पोल जाहीर केले. या एक्झिट पोलमध्ये भाजपा निवडून येणार अशी शक्यता वर्तवली. त्याप्रमाणे भाजपाने यशदेखील संपादन केले. यावेळी अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. मात्र भाजपाने तसेच अण्णा हजारे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, "आजकाल या निवडणुका लोकशाही पद्धतीने लढवल्या न जाता सैतानी किंवा हैवानी पद्धतीने लढवल्या जातात. जो घोटाळा महाराष्ट्रामध्ये दिसला तोच घोटाळा दिल्लीमध्येही दिसून आला. जेव्हा लोकशाहीवर हल्ला झाला तेव्हा आण्णा हजारे शांत राहिले. मात्र जेव्हा केजरीवाल हरले तेव्हा त्यांना खुप आनंद झाला", असा टोला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com