संजय राऊतांनी रात्री उशिरा केलं सूचक ट्वीट; म्हणाले, हे बनावट प्रकरण...

संजय राऊतांनी रात्री उशिरा केलं सूचक ट्वीट; म्हणाले, हे बनावट प्रकरण...

संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मयूर शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मयूर शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरून राजकारण तापलेलं आहे. मयूर शिंदे शिवसेनेचाच कार्यकर्ता असल्याची माहिती सध्या व्हायरल होत आहे. यावरून भाजपा आणि मनसेनं ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.

यावरुन आता संजय राऊत यांनी मध्यरात्री एक ट्विट केलं आहे. जाहिरात कांडा वरून लक्ष उडवण्यासाठी रचलेला हा बनाव. स्पष्ट दिसते आहे. ठाणे परिसरातील सर्व गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक एकतर भाजपात आहेत नाहीतर सध्याच्या शिंदे गटात... हे लोक आमच्यासाठी असे काही करतील यावर कोणी मूर्ख सुध्दा विश्वास ठेवणार नाही..हे बनावट प्रकरण त्यातलेच आहे..असे म्हणत संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.

Admin
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com