राऊतांच्या 'त्या' ट्विटवर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रीया

राऊतांच्या 'त्या' ट्विटवर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रीया

खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या एका फोटोमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. संजय राऊत यांनी एका कॅसिनोमधील फोटो ट्विट केलाय.

खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या एका फोटोमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. संजय राऊत यांनी एका कॅसिनोमधील फोटो ट्विट केलाय. या फोटोमधील व्यक्तीने एका रात्रीत 3.50 कोटी रुपये कॅसिनो जुगारात उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात, असा दावा संजय राऊतांनी केलाय. “हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?”, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. त्यांच्या या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावरच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

ते म्हणाले की, मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या या ट्विटवर प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपच्या ट्विटर अकाऊंट वरुन आदित्य ठाकरेंचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ज्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या हातात ग्लास दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com