'तिथे *** का तुमची' शिरसाटांचा भिडेंवर हल्लाबोल

'तिथे *** का तुमची' शिरसाटांचा भिडेंवर हल्लाबोल

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत,
Published by  :
shweta walge

सचिन बडे, छत्रपती संभाजीनगर;- महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. या विधानावरुन विरोधक संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभमीवर आता आमदार संजय शिरसाट यांनी संभाजी भिंडेवर हल्लाबोल केला आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, भिडे यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. भिडेंवर कारवाई केली जाईल. असे वक्तव्य खपवून घेणार नाही. ते नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतात. मी कारवाई करण्याची मागणी करणार आहे. भिडे गुरुजी यांचा इतिहास काढला तर त्यांना कसं वाटेल, त्यांना दाखला दिला का इतिहास काढायचा, हे महात्मा झाले का? ही भुमिका पक्षाची नाही माझी आहे. याप्रकारे वक्तव्य कोणी करु नये, समाजामध्ये तेढ कशाला, तुम्ही बाकी समाजाचा का इतिहास काढत नाही, तिथे फाटते का तुमची. अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

दरम्यान शिरसाटांनी उद्धव ठाकरे यांच्या आजच्या ठाण्यातील सभेवर देखील टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले की, आज ठाण्यात उत्तर भारतीयांची उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. यांनी अनेकवेळा त्यांच्या विरोधात बोलले आहेत, भुमिका चांगली आहे परंतु दुटप्पी आहे.

जास्त लांब जाण्याची मानसिकता नाही, ते जवळच सभा घेतात. ते गडचिरोलीला जाऊन सभा घेणार नाहीत. ते मातोश्रीपासून जवळ असणाऱ्या ठिकाणी सभा घेतात.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com