Sanjay Shirsat On MVA : 'एक भाकर त्याला किती तुकडे पाडणार, महाविकास आघाडी टिकणार नाही'
थोडक्यात
आज (1 नोव्हेंबर) मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी एल्गार पुकारणार आहेत.
आज मुंबईत (Mahavikas Aghadi Mumbai Morcha) महाविकास आघाडी आणि मनसे आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे.
मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे.
Sanjay Shirsat On MVA : आज (1 नोव्हेंबर) मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी एल्गार पुकारणार आहेत. आज मुंबईत (Mahavikas Aghadi Mumbai Morcha) महाविकास आघाडी आणि मनसे आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं सत्याचा मोर्चा असं नामकरण करण्यात आलंय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), आदित्य ठाकरे, अमित ठाकरे या मोर्चाला उपस्थित असणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे.
त्यावेळी ते म्हणाले की, "निवडणूक आयोगाने मतचोरीचा प्रकरणाचा आढावा घेतला पाहिजे. अशा बोगस याद्या कोणत्या एका मतदार संघात नसून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत असे सर्वजण मान्य करतात. म्हणून एकदा ही सगळी घाण ज्याला म्हणतो साफ केली पाहिजे. विरोधकांचा मोर्चा म्हणजे स्डंटबाजी आहे. यापुर्वी सुद्धा ते निवडणूक आयोगाला भेटले होते त्याच्यांशी चर्चा झाली होती. हे फक्त शक्तीप्रदर्शांसाठी करत आहेत. तसेच महाविकास आघाडी किती मजबूत आहे हे दाखवण्याचा त्यांचा राजकीय स्टंट आहे. त्या स्टंच बद्दल आम्ही काही बोलणारच नाही. जो प्रश्न ते घेऊन जात आहे तो प्रश्न एक-दोन बैठकीत निर्णय निघणारा आहे. यांच्यासाठी मुंबईच्या लोकांना वेटीस धरावं असं आमचं मत आहे. "
