ताज्या बातम्या
Sanjay Shirsat VS Abdul Sattar: सत्तारांनी मंजूर केलेली कामे शिरसाटांकडून रद्द
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना धक्का दिला, सत्तारांनी मंजूर केलेली 20 कोटींची विकासकामे शिरसाटांनी रद्द केली आहेत.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का दिला आहे. तत्कालीन पालकमंत्री असताना सत्तारांनी मंजूर केलेली 20 कोटींची विकासकामे आताचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रद्द केली आहेत.
चार महिन्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात मनमानी पद्धतीने कारभार करत सर्वाधिक निधी आपल्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघासाठी नेणाऱ्या अब्दुल सत्तार यांना नवे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी हिसका दाखवत आधी मंजूरी दिलेल्या तब्बल 20 कोटींच्या कामावर फुली मारली आहे.