Sanjay Shirsath - Sanjay Raut
Sanjay Shirsath - Sanjay RautTeam Lokshahi

"बाळासाहेब असते तर त्यांनी संजय राऊतांना..."; संजय शिरसाट यांचा खरपूस टोला

शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट आज औरंगाबादमध्ये दाखल झाले.
Published by :
Sudhir Kakde

शिवसेनेतून तब्बल 40 आमदार घेऊन तत्कालीन नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सरकारमधून बाहेर पडले आणि भाजपसोबत (BJP) जात त्यांनी सरकार स्थापन केलं. यामुळे मागच्या काही कालावधीमध्ये राज्यात मोठा राजकीय गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळाला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अन् राज्यात नवं सरकार आलं. त्यानंतर आता शिंदे गटातील सर्व आमदार आता आपापल्या मतदारसंघांमध्ये परतत असून, त्याठिकाणी समर्थकांकडून त्यांचं जोरदार स्वागत केलं जातंय.

Sanjay Shirsath - Sanjay Raut
"उद्धव ठाकरेंना माझा बिनशर्त पाठिंबा..."; शपथपत्रातून सेनेची अस्तित्वासाठी लढाई

शिंदे सोबत बंड करणाऱ्या आमदारांमध्ये एकट्या मराठवाड्यातून संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, रमेश बोरणारे, संदीपान भुमरे हे आमदार होते. यातल्या संजय शिरसाठ यांनी अतिशय धुमधडाक्यात औरंगाबादमधील आपल्या मतदारसंघात प्रवेश केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर टीका केली. "संजय राऊत हा माणूस रोज सकाळी उठून काही तरी अॅक्शन करतो, बरं तरी हा अमिताभ बच्चन सारखा सुंदर नाही. तो बोलतो की, जे 40 आमदार पळून गेले ते वेश्या आहेत, त्यामध्ये अनेक महिला आमदार होत्या त्या आमच्याजवळ रडल्या. तो म्हणतो या सर्व आमदारांना कामाठीपुऱ्यात उभं करा, बाळासाहेब असते तर, ...वर लाथ मारुन याला बाहेर हाकलून दिलं असतं" असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पक्षाची पडझड झाल्यानंतर शिवसेनेने एकीकडे बैठकांचं सत्र सुरु केलं असून, दुसरीकडे शिवसैनिकांकडून आता प्रतिज्ञापत्र सुद्धा लिहून घेतली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याकाळात शिवसेनेसोबत असणारे अनेक निष्ठावान आमदार आज पक्ष सोडून गेल्यानं पक्षातील कार्यकर्ते नेमके पक्षासोबत आहेत की नाही याची सुद्धा आता परिक्षा आगामी काळातील निवडणुकांमध्ये होणार आहे. एकीकडे केंद्रात सत्ता असलेल्या भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, तर दुसरीकडे पक्षातल्याच शिलेदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आपली वेगळी चूल मांडली. यामुळे आता शिवसेनेला पक्षाचा जिल्हाप्रमूख ते शाखाप्रमूख आणि शेवटच्या स्तरातील प्रत्येक कार्यकर्त्याची साथ असणं गरजेचं आहे. त्यासाठीच सेनेकडून सध्या बाँडपेपवर प्रतिज्ञापत्र लिहून घेतली जात आहेत. त्यामुळे एकीकडे शिवसेना संपणार नाही असं म्हणणारे ठाकरे दुसरीकडे संघटना वाचवण्यासाठी धडपडत असल्याचं पाहायला मिळतंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com