ताज्या बातम्या
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात जन आक्रोश मोर्चा
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे.
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.
मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी होणार असून सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित असणार आहे.