नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा विरोध; संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नी संयोगिताराजेंनी केली पोस्ट शेअर
Admin

नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा विरोध; संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नी संयोगिताराजेंनी केली पोस्ट शेअर

नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा विरोध; संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नी संयोगिताराजेंनी केली पोस्ट शेअर

धार्मिक क्रिया पुराणोक्त विधीनुसार न करता त्या फक्त वैदिक विधी नुसारच करण्यात याव्यात असा आदेश शाहू महाराज यांनी काढला होता. त्यांच्या हा आदेश नारायणराव राजोपाध्ये यांनी फेटाळला होता. हा वाद चांगलाच चिघळत गेला. त्यानंतर  छत्रपती शाहू महाराज यांचे घराणे क्षत्रिय असून वेदोक्त कर्म करण्यास काही हरकत नाही असे करवीर धर्मपीठाचा वेदोक्त प्रकरणी निर्णय घेण्यात आला.

काल (30मार्चला) रामनवमीच्या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी पूजा केली. महंतांनी ही पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध करत त्यांना वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. मात्र छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यातील असल्याने मी त्यास विरोध दर्शवला. मात्र वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही असे महंतांनी सांगितले.

यावर आता संयोगीताराजे छत्रपती यांनी याबाबत सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे. त्यांनी ही पोस्ट करत लिहिले की, हे श्रीरामा, स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे. हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आपण सर्वजण देवाची लेकरे आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी?या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते.

त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले. नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला.अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच. तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे. हा सगळा प्रकार संयोगीता राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com