Satara Female Doctor case : मुख्य संशयित प्रशांत बनकर चार दिवस पोलीस कोठडीत
Satara Female Doctor case : मुख्य संशयित प्रशांत बनकर चार दिवस पोलीस कोठडीत; PSI गोपाल बदने अजूनही फरारSatara Female Doctor case : मुख्य संशयित प्रशांत बनकर चार दिवस पोलीस कोठडीत; PSI गोपाल बदने अजूनही फरार

Satara Female Doctor case : मुख्य संशयित प्रशांत बनकर चार दिवस पोलीस कोठडीत; PSI गोपाल बदने अजूनही फरार

Satara Female Doctor case : फलटण शहरातील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित प्रशांत बनकरला आज न्यायालयात हजर करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने सुनावणीदरम्यान बनकरला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Satara Female Doctor case : फलटण शहरातील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित प्रशांत बनकरला आज न्यायालयात हजर करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने सुनावणीदरम्यान बनकरला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सरकारी पक्षाकडून या प्रकरणातील तपासाची व्याप्ती लक्षात घेता किमान सात दिवसांची कस्टडी मागण्यात आली होती. मात्र, आरोपीच्या बाजूने वकील सुनील भोंगळे यांनी कमी कोठडीची मागणी करत युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केली. या घटनेनंतर पोलिसांनी पुण्यातून प्रशांत बनकरला ताब्यात घेतले. हातावर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याच्यावर मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा उल्लेख डॉक्टर युवतीने केला होता. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा अधिक गंभीर स्वरूपात नोंदवण्यात आला असून तपास जलद गतीने सुरू आहे.

PSI गोपाल बदनेचा शोध अजूनही सुरू

या प्रकरणातील दुसरा संशयित PSI गोपाल बदने अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचे शेवटचे लोकेशन पंढरपूर परिसरातील असल्याचे समजते. नंतर त्याचा मोबाईल बंद झाल्याने त्याच्या हालचालींबाबत पोलीस अनभिज्ञ आहेत. बीड जिल्ह्याशी त्याचा संबंध असल्याने त्या दिशेला तो पळाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या पथकांनी त्याच्या वाहनासह व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. पण, आतापर्यंत तो फरारीच आहे. बदनेला अटक कधी होणार आणि तपासात नेमके काय उघड होणार याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

कुटुंबीय आणि नातेवाईकांनी प्रशांत बनकर हा या प्रकरणातील प्रमुख दोषी असल्याचा आरोप करत, त्याला कठोर शिक्षा, अगदी फाशीपर्यंतची मागणी केली आहे. दरम्यान, तपास पथक आरोपींकडे नेत असलेल्या पुराव्यांचा बारकाईने अभ्यास करत असून पोलिस पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या खुलाशांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com