Satish Bhosale Beed : सतीश भोसले उर्फ खोक्याची बीड पोलिस ठाण्यात रवानगी; 'या' दिवशी संपणार पोलिस कोठडी
बीडमधील सतीश भोसलेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या राहत्या घरातून वनविभागानं प्राण्यांचं वाळलेलं मांस जप्त केल होत. एवढचं नाही तर खोक्याचं घर ही वनविभागाच्या जागेवर बेकायदेशीरपणे असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर वनविभागाने पोलिसांच्या मदतीने खोक्याचं घर जमीनदोस्त केलं.
8 मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभाग आणि पोलिसांनी छापा टाकला होता, यादरम्यान त्याच्या घरात काळ्या बाजारात 7 हजार 200 रुपये किंमत असलेला 600 ग्रॅम सुका गांजा आणि प्राण्यांचं वाळलेलं मांसही या कारवाईत जप्त करण्यात आलं आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधात NDPS कायद्या अंतर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल केला होता. याचपार्श्वभूमिवर सतीश भोसले याच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसलेची बीड शहर पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली. तसेच शिरूर कासार न्यायालयाने पोलीस कोठडी सूनावल्यानंतर 3 दिवस शिरूर पोलीस ठाण्यात त्याचा मुक्काम होता. सुरक्षेच्या कारणास्तव सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता 20 मार्च रोजी सतीश उर्फ खोक्या भोसलेची पोलीस कोठडी संपणार आहे.