सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं; उद्या करणार भूमिका स्पष्ट

सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं; उद्या करणार भूमिका स्पष्ट

नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. याठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी मोठा विजय मिळवला. तर, महाविकास आघाडी समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा तब्बल 29 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. सत्यजीत तांबे यांना तब्बल 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झाला.

या विजयावर प्रतिक्रिया देताना सत्यजित तांबे म्हणाले की, या निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिले. मी लोकांना प्रेम दिलं आहे, पैसे वाटले नाहीत. मी सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन. "सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं आहे. मी पैसे वाटले नाहीत तर लोकांना प्रेम दिलं. असे ते म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, दरम्यान 4 फेब्रुवारीला म्हणजे उद्याच मी पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली. या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सत्यजीत तांबे यांनी जनतेचे आभार मानले. या निवडणुकीत अनेक संघटना आणि संस्थांनी मला मदत केली आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी तीन टर्म चांगली सेवा केली आहे. आता अशीच सेवा माझ्याकडून होईल. असेही ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com