Scholarship Exam : शिष्यवृत्तीची 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, परीक्षेची नवी तारीख जाहीर

Scholarship Exam : शिष्यवृत्तीची 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, परीक्षेची नवी तारीख जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा (Exam) परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2026 च्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्र राज्य परीक्षा (Exam) परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2026 च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 ऐवजी 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. त्यामुळे, शिष्यवृत्ती (Scholarship) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी नव्या वेळापत्रकानुसार आपल्या पाल्यांसाठी परीक्षाचे नियोजन करणे गरजेचे आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) देखील 8 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सीटीईटी परीक्षेला बसणार असल्याने त्यांच्याकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचा दिवस बदलत नवीन तारीख 22 फेब्रुवारी 2026 जाहीर केली आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शाळांनी व परीक्षा केंद्रांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा काय असते?

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागामार्फत शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत मिळवण्याची एक स्पर्धाच. ज्या विविध स्तरांवर घेतल्या जातात. या परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी किंवा इतर गरजांसाठी आर्थिक मदत मिळते. महाराष्ट्रात, राज्य शिक्षण विभागातर्फे चौथी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात, तर राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा (NICE) आणि इतर अनेक राष्ट्रीय योजनांद्वारे शिष्यवृत्ती दिल्या जातात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com