ताज्या बातम्या
भारताची मोठी कारवाई; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या एका दहशतवाद्याचे घर बॉम्बने उडवले, तर दुसर्याच्या घरावर फिरवला बुलडोझर
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 28 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
यातच आता या पार्श्वभूमीवर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांची मोठी कारवाई समोर आली आहे. दहशतवादी आसिफचे घर स्फोटाने उडवले तर आदिलच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे.
सुरक्षा यंत्रणांनी मोठी मोहीम सुरू केली असून दहशतवादी आसिफच्या घरी पोहोचले. त्याच्या घरात स्फोटकांचा साठा होता, ज्यामुळे हा स्फोट झाला, असे सांगितले जात आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर घर पाडले.