Aurangzeb Kabar : संभाजीनगरमधील औरंगजेब कबरीची सुरक्षा वाढवली; परिसरात 'रेड झोन' घोषित

संभाजीनगरमधील औरंगजेब कबरीची सुरक्षा वाढवली आहे. परिसर 'रेड झोन' घोषित, ड्रोन उडवण्यास बंदी, लोखंडी पत्र्याची तटबंदी उभी.
Published by :
Prachi Nate

संभाजीनगरमधील औरंगजेब कबरीची सुरक्षा वाढवली आहे. औरंगजेबाची कबर असलेला परिसर 'रेड झोन' घोषित करण्यात आलेला असून औरंगजेब कबर परिसर 18 एप्रिलपर्यंत 'रेड झोन' असणार आहे. औरंगजेब कबर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी आलण्यात आली असून कबरीचे कापड हटवून लोखंडी पत्र्याची तटबंदी उभी करण्यात आलेली आहे.

खुलताबाद येथील औरंगजेबची कबर काढण्याच्या मुद्द्यावरून राज्यभर वाद निर्माण झाल्याने, पोलिसांचा कडक बंदोबस्त लावला असताना काल कबरीच्या पाठीमागील संरक्षक भिंतीवरून आत कोणीही जाऊ नये, यासाठी लोखंडी अँगलला पत्रे मारण्यात आले आहेत. कबरीपर्यंत कोणत्याही बाजूने कोणीही घुसू नये यासाठी, सुरक्षा कवच वाढवण्यात आलं आहे.

यापूर्वी कबरीच्या पाठीमागील बाजूस कमी उंचीच्या संरक्षण भिंतीला लागून लोखंडी अँगल लावून हिरवा कपडा लावण्यात आला होता. बुधवारी संध्याकाळी पुरातत्व विभागाने कबरीच्या पाठीमागील बाजूस असलेला हिरवा कपडा काढून त्या जागी लोखंडी पत्रे मारले आहेत. त्यामुळे कबरीच्या पाठीमागील बाजू अधिक सुरक्षित झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com