Anant Chaturdashi 2025 Wishes : निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी...! अनंत चर्तुदशीनिमित्त गणेशभक्तांना पाठवा खास शुभेच्छा, WhatsApp, Facebook च्या माध्यमातून ठेवा कोट्स स्टेटस
Anant Chaturdashichya shubhecha In Marathi : दहा दिवसांच्या या भक्तीमय उत्साहानंतर गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन केले जाते. लाडक्या बाप्पाला जड अंतकरणाने निरोप देण्याची वेळ आली आहे. यंदा अनंत चर्तुदशी ही 5 सप्टेंबरला मंगळवारी आहे. अनंत चर्तुदशीनिमित्त WhatsApp, Facebook च्या माध्यामातून शेअर करुयात शुभेच्छा!
"निरोप घेताना देवा आम्हास
आज्ञा असावी
चुकले आमचे काही तर क्षमा करावी
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा !"
आभाळ भरले होते तुम्ही येताना
आता डोळे भरलेत पाहून तुम्हाला जातांना
अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा!
रिकामं झालं घर,
रिता झाला मखर पुढल्या वर्षी लवकर येण्यास निघाला
लंबोदर अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा
तुझ्या येण्यान गणराया घर माझं
आनंदात नाहून जातं अनंत चतुर्दशीचा निरोप
तुला देतांना मन माझं भरून येतं
अनंत चतुर्दशीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा
बाप्पा माझ्या जीवनातील सर्व
माणसांना उदंड आयुष्य लाभू देत,
त्यांच्यावर सदैव तुझी कृपादृष्टी राहू देत
हीच तुझ्या चरणी प्रार्थना
अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!