BDD Chawal Digital Arrest case : मुंबईतील ज्येष्ठ नागरिकाला 'Digital Arrest'चा फटका, घातला एवढा लाखाचा गंडा
थोडक्यात
मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
बीडीडी चाळीतील ज्येष्ठ नागरिकाला डिजीटल अरेस्टचा फटका बसला.
त्या व्यक्तीने स्वत:ची दिल्ली पोलिस अधिकारी म्हणून ओळख करून दिली
(Digital Arrest) मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बीडीडी चाळीतील ज्येष्ठ नागरिकाला डिजीटल अरेस्टचा फटका बसला. सायबर गुन्हेगारांवर विश्वास ठेवून तब्बल ७५.५ लाख रुपये गमावलेत. दिल्ली पोलिस अधिकारी असल्याचे सांगत त्यांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील बीडीडी चाळीतील ज्येष्ठ नागरिकाला डिजीटल अरेस्टचा फटका बसला. २२ ऑगस्ट रोजी पीडित व्यक्तीला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने स्वत:ची दिल्ली पोलिस अधिकारी म्हणून ओळख करून दिली आणि सांगितले की त्यांच्या बँक ऑफ बडोदा खात्याचा वापर २.८३ कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात झाला आहे... या प्रकरणात त्यांना दिल्ली पोलिस अटक करतील अशी थाप मारत पैसे लुबाडले.
