ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले आहे.

ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले आहे. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.  दिल्ली आकाशवाणीवरुन पहिल्या मराठी बातम्या वाचणारे ते निवेदक ठरले. तसंच ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. विश्वास मेहेंदळे यांनी मुंबई दूरदर्शन केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याची धुराही त्यांनी सांभाळली होती. 18 हून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. याशिवाय अनेक नाटकांमध्ये भूमिकाही साकारल्या आहेत. विश्वास मेहेंदळे सिम्बोयसीस इ्स्टिट्यूट ऑफ मिडीया आणि कम्युनिकेशनचे संस्थापक ते होते.

तसेच अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषेच्या पुणे शाखेकडून ‘मधुकर टिल्लू स्मृती एकपात्री कलाकार’ या पुरस्काराने विश्वास मेहंदळे यांचा सन्मान करण्यात आला आहे. 25 मे 2017 रोजी विश्वास मेंहदळे यांना हा पुरस्कार मिळाला. याशिवाय सृजन फाऊंडेशनने महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुण्यात 2010 मध्ये भरवलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद डॉ.विश्वास मेहेंदळे यांनी भुषवले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com