खळबळजनक; लालबागमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह तर निर्माणाधीन इमारतीत तरुणाचा मृतदेह सापडला
Admin

खळबळजनक; लालबागमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह तर निर्माणाधीन इमारतीत तरुणाचा मृतदेह सापडला

लालबागमधून दोन धक्कादायक घटना समोर येत आहे.

लालबागमधून दोन धक्कादायक घटना समोर येत आहे. एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये 53 वर्षीय महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये सापडला. तर दुसरीकडे एका निर्माणाधीन इमारतीत 19 वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळला आहे. लालबागमधील एका निर्माणाधीन इमारतीच्या बाराव्या मजल्यावर 19 वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळला. मसूदमियां रमझान असं या तरुणाचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच लालबागच्या इब्राहिम कासिम इमारतीच्या पहिल्या फ्लॅटमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी इमारतीत आले. त्यावेळी घरात शोध घेताना महिलेचा मृतेदह एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढचा तपास सुरु केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com