Mumbai Metro : घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोसेवा तांत्रिक बिघाडामुळे बंद , कामावरुन घरी जाणाऱ्या नागरिकांना त्रास
थोडक्यात
मुंबईच्या घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड
त्यामुळे सेवा विस्कळीत झाली आहे.
घाटकोपरहून वर्सोवाच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवरील गाड्या पाऊणतास बंद पडली आहे.
मुंबईच्या घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सेवा विस्कळीत झाली आहे. घाटकोपरहून वर्सोवाच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवरील गाड्या पाऊणतास बंद पडली आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. प्रवाशांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत या तांत्रिक बिघाडाची माहिती शेअर केली आहे.
मुंबईमेट्रो-१ ही सध्याची मुंबईतील मेट्रो मार्गिकांपैकी सर्वाधिक वर्दळीची अशी मार्घिगा आहे. वर्सोवा ते घाटकोपर या मार्गिकेवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अंधेरी, साकिनाका, मरोळ परिसरातील कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये जाण्यासाठी या मार्गिकेवर दररोज प्रचंड गर्दी असते. सोमवारचा दिवस असल्याने प्रवाशांची संख्या देखील अधिक आहे. अशातच तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी रखडले आहेत.
