ताज्या बातम्या
Student Protest Delhi : गो बॅक... जेएनयू कँम्पसमध्ये SFI विद्यार्थ्यांचे फडणवीसांविरोधात आंदोलन
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले असून दिल्लीतील जेएनयू कँम्पसमध्ये देवेंद्र फडणवीसांविरोधात SFI विद्यार्थ्यांचे आंदोलन केले आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले असून तिथे जेएनयूमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार होते. मात्र फडणवीस त्याठिकाणी पोहचण्याआधीच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदें गो बँक अशा जोरदार घोषणाबाजी करत, जेएनयू कँम्पसमध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI)चं आंदोलन सुरु झालं.
तसेच प्रोपोगंडा चालणार नाही असे फलक झळकावत संघाचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन महाराष्ट्रातील मराठी हिंदी वादावरुन आंदोलन झाल्याच सांगण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्रात हिंदी-मराठी वादावरून परप्रांतियांना मारहाण होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांकडून उद्धघाटन का असा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांकडून हे आंदोलन करण्यात आलं आहे.