'अजित पवार घोटाळेबाज, कधीही अटक होऊ शकते, त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं'; माजी आमदार शालिनीताई पाटलांचे मत

'अजित पवार घोटाळेबाज, कधीही अटक होऊ शकते, त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं'; माजी आमदार शालिनीताई पाटलांचे मत

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली असून यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी उपोषण आंदोलन सुरु केले.

याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांनी आपला निर्णय कायम ठेवला तर राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावरुन आता प्रतिक्रिया येत आहेत.

यावर आता माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका माध्यमांशी बोलताना शालिनीताई पाटील म्हणाल्या की, शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय खुप घाईत घेतला.शरद पवार माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही काम करते. अजित पवार घोटाळेबाज आणि गुन्ह्यामध्ये अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनाच अध्यक्षपद द्यावे असे शालिनीताई पाटील म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com