Shambhavi Pathak : घरी लग्नाची रिंगण सजत असताना, अपघाताने थांबवले स्वप्न; पायलट शांभवीचा अंत्यप्रवास
एव्हिएशन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी तरुण वैमानिक शांभवी पाठक हिने शिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभवाच्या जोरावर विमानवाहतुकीच्या क्षेत्रात भक्कम पाऊल ठेवले आहे. शैक्षणिक तयारीपासून ते प्रत्यक्ष उड्डाणांपर्यंतचा तिचा प्रवास उल्लेखनीय ठरतो. शांभवीने 2020 ते 2022 या कालावधीत मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स, एव्हिएशन, एयरोस्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये बीएससी पदवी प्राप्त केली. त्याआधीच तिने परदेशात जाऊन व्यावसायिक वैमानिक होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले होते. 2018 -2019 या काळात न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमीमधून तिने एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला होता.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2022 पासून शांभवी VSR Venture प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत फर्स्ट ऑफिसर म्हणून कार्यरत होती. याच कंपनीच्या माध्यमातून ती वैमानिक म्हणून विमानसेवा बजावत होती. तिच्या व्यावसायिक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे एव्हिएशन सेक्युरिटी स्पाईसजेटकडून तिला मिळालेला वैमानिक परवाना. मार्च 2022 मध्ये हा परवाना इश्यू झाल्याची माहिती तिने स्वतःच्या लिंक्डइन प्रोफाईलवर नमूद केली आहे. याशिवाय फेब्रुवारी 2022 मध्ये जेट ओरिएंटेशन ट्रेनिंग अंतर्गत तिने A-320 या प्रवासी विमानाचे विशेष प्रशिक्षणही यशस्वीरित्या पूर्ण केले होते. या प्रशिक्षणानंतर तिला संबंधित प्रमाणपत्र देण्यात आले होते, ज्यामुळे तिच्या व्यावसायिक पात्रतेत भर पडली.
शांभवी पाठक हिला आजपर्यंत जवळपास 1500 तासांचा उड्डाणाचा अनुभव असून ती आत्मविश्वासाने विमानसेवा देत होती. तिच्यासोबत कार्यरत असलेले कॅप्टन सुमित कपूर हे अत्यंत अनुभवी वैमानिक असून त्यांचा विमानसेवेतील एकूण अनुभव तब्बल 16 हजार तासांचा आहे. कॅप्टन सुमित यांनी सहारा जेट एअरवेज तसेच जेट लाइट्ससारख्या नामांकित विमान कंपन्यांमध्ये काम केले आहे. दरम्यान, शांभवीचे वडील हे सैन्य दलात अधिकारी पदावर कार्यरत असल्याची माहिती असून, शिस्त, जबाबदारी आणि देशसेवेचे संस्कार तिला कुटुंबातूनच लाभले असल्याचे सांगितले जाते. एव्हिएशन क्षेत्रातील कठोर प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मेहनत आणि अनुभवाच्या बळावर शांभवी पाठकने आकाशात झेप घेणाऱ्या तरुण वैमानिकांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले होते.
थोडक्यात
शांभवी पाठक, तरुण वैमानिक, एव्हिएशन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करत आहे
शिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभवाच्या जोरावर विमानवाहतुकीत भक्कम पाऊल
शैक्षणिक तयारीपासून प्रत्यक्ष उड्डाणांपर्यंतचा प्रवास उल्लेखनीय
2020–2022: मुंबई विद्यापीठातून बीएससी पदवी – एरोनॉटिक्स, एव्हिएशन, एयरोस्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजी

