राऊतांना तुरुंगाबाहेरचं वातावरण मानवत नाही का? - शंभूराजे देसाई

राऊतांना तुरुंगाबाहेरचं वातावरण मानवत नाही का? - शंभूराजे देसाई

बेळगाव सीमाभागातील हिरेबागवाडी टोलनाक्यावर काल (6 डिसेंबर) महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या सहा ट्रकची तोडफोड कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

बेळगाव सीमाभागातील हिरेबागवाडी टोलनाक्यावर काल (6 डिसेंबर) महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या सहा ट्रकची तोडफोड कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे. या प्रकारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना फोन करुन निषेध व्यक्त केला. यावर बसवराज बोम्माई यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचं तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं.

या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र इतका लेचा-पेचा कधीच झाला नव्हता. यांनी तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले आहे. दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही, असा गंभीर आरोप संजय राऊत यांना केला आहे.

यावर प्रतिउत्तर देत शंभूराजे देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शंभूराजे देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य केल्यास आम्ही दोन हात करायला तयार आहोत, महाराष्ट्र-कर्नाटक वादावर आम्ही चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. केंद्रानं या प्रकरणात लक्ष घालावं. संजय राऊत यांची बोलण्याची पद्धत महाराष्ट्र सहन करणार नाही. संजय राऊतांना षंड बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं असे देसाई म्हणाले.

राऊतांना तुरुंगाबाहेरचं वातावरण मानवत नाही का? - शंभूराजे देसाई
दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही - संजय राऊत

यासोबतच 'आताच तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करुन तुरुगांबाहेर आला आहात. तुरुंगाबाहेरच वातावरण तुम्हाला मानवत नाही असं वाटतंय, म्हणून तुम्ही अशी वक्तव्य करताय. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्य करणं टाळावं.' असा जोरदार टोला शंभूराजे देसाई राऊतांना लगावला आहे.

राऊतांना तुरुंगाबाहेरचं वातावरण मानवत नाही का? - शंभूराजे देसाई
महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पुन्हा स्थगित
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com