शरद केळकरचा मोठा निर्णय, आता करणार 'हे' काम?
अभिनेता शरद केळकरची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. आपल्या भारदस्त आवाजाने त्याने मराठी आणि हिंदीच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टिमध्येही एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. मात्र शरद केळकरने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शरद केळकर टेलिव्हिजन क्षेत्रापासून दूर असलेला बघायला मिळत आहे. मात्र आता पुन्हा एकदा तो छोट्या पडद्यावर दिसणार असल्याचे समोर येत आहे.
शरद केळकरने त्याच्या करियरमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खूप वर्षांपूर्वी तो मालिकांमध्ये काम करताना दिसत असे मात्र नंतर त्याने आपला मोर्चा चित्रपटांकडे आणि डबिंगकडे वळवला. त्यामुळे टेलिव्हिजनवरील त्याचे फॅन्स खूप आतुरतेने वाट बघत होते. अशातच आता त्याने छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद केळकर 2017 साली शेवटचा मालिकांमध्ये दिसून आला होता. आता पुन्हा एकदा मालिकेमध्ये काम करताना दिसणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, तुम से तुम तक या मालिकेसाठी करणसिंह ग्रोवर याचा आणि शरद केळकरचा विचार केला जात होता. मात्र मालिकेच्या निर्मात्यांनी बराच विचार करून शरद केळकरच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. आता तुम से तुम तक या मालिकेत शरद केळकर आणि निहारिका यांची जोडी कमाल दाखवणार का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ही मालिका 2025 सालाच्या आयपीएलमध्ये चालू होण्याची शक्यता आहे. या मालिकेची शूटिंग अद्याप चालू झालेली नाही. लवकरच शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे.